Refugees In India: शरणार्थी म्हणजे ते लोक जे आपल्या देशाची वाईट परिस्थिती, युद्ध, राजकीय उलथापालथ या भीतीमुळे दुसऱ्या देशात आश्रय घेतात. आशा लोकांना नागरिकत्व मिळत नाही. मात्र जिवाच्या भीतीने किंवा इतर परिस्थितीमुळे त्यांना आपल्या देशात परतण्याची इच्छा नसते. असे लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतात. अशातच भारतात अशा लोकांची संख्या किती आहे, असा प्रश्न आहे. इतर देशांचे किती नागरिक भारतात शरणार्थी आहेत. तर याचे उत्तर आहे 46 हजार.


UNHCR नुसार, 31 जानेवारी 2022 पर्यंत 46,000 हून अधिक शरणार्थी आणि आश्रयाच्या शोधात असलेले UNHCR भारतामध्ये नोंदणीकृत आहेत. हे शरणार्थी प्रामुख्याने म्यानमार आणि अफगाणिस्तानमधील आहेत. भारतातील निर्वासित आणि आश्रय शोधणारे प्रामुख्याने शहरी भागात राहतात. 46% निर्वासित महिला आणि मुली असून 36% मुले आहेत. भारत अनेक दशकांपासून निर्वासितांच्या विविध गटांना शरण देत आहे.


2002 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत 17,933 श्रीलंकेचे निर्वासित UNHCR च्या सहाय्याने भारतातून स्वेच्छेने परतले आहेत. भारत अनादी काळापासून निर्वासित आणि आश्रयाची गरज असलेल्यांना शरण देत आला आहे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना जागा आणि सुरक्षितता मिळेल याची हमी देणारा भारत हा विश्वासू देश आहे. दरम्यान, UNHCR ही संस्था भारतात निर्वासित आणि आश्रय शोधणार्‍यांचे संरक्षण करण्यासाठी 1981 पासून काम करत आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांद्वारे समर्थित UNHCR भारताच्या 11 राज्यांमध्ये गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, नीती आयोगसह काम करत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


INS Vikrant :  शत्रूलाही धडकी भरवणाऱ्या 'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेचे नेमकं काय झालं? जाणून घ्या


ED vs Shiv Sena : राज्यात ईडी विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटणार?