पुलवामा हल्ल्यानंतर सरकारला सैनिकांच्या सुरक्षेबाबत उशीरा शहाणपण सुचलं आहे. असे सर्वत्र बोलले जात आहे. जवान सुट्टीवर जातील तेव्हा, सुट्टीवरुन परततील तेव्हा किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी (जम्मू-काश्मीरमध्ये) नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. प्रामुख्याने दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-जम्मू या मार्गांवर विमान सेवेचा वापर केला जाईल.
जम्मू काश्मीरमध्ये तैनात असल्येला 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.