Chhattisgarh First Woman Agniveer : एका रिक्षाचालकाच्या (Auto Driver ) मुलीची पहिली महिला अग्निवीर (First Woman Agniveer) म्हणून निवड झाली आहे. छत्तीसगडमधील रिक्षाचालकाच्या मुलीने आपल्या मेहनत आणि हिंमतीच्या जोरावर येश मिळवलं आहे. हिशा बघेल दुर्ग (Hisha Baghel Durg) ही अग्निवीर योजनेसाठी निवड झालेली पहिली तरुणी आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तिच्या वडिलांची 12 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे.


अग्निवीर भरतीमध्ये निवड होणारी पहिली तरुणी


हिशा बघेल मूळची छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील बोरीगरका गावची रहिवासी आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत हिशाने अग्निवीर भरती प्रक्रिया 2023 मध्ये भाग घेतला होता. यामध्ये तिची निवड झाली आहे. अग्निवीर भरतीमध्ये निवड होणारी ती पहिली तरुणी आहे. हिशा आता ओदिशातील चिल्का येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे. चिल्का येथे मार्चपर्यंत भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरतीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती महिला अग्निवीर म्हणून देशाचे रक्षण करेल. 


'माझी मुलगी खूप मेहनती, मला तिचा अभिमान आहे'


मुलीच्या यशाबद्दल, हिसाची आई सती बघेल यांनी म्हटलं की, 'मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. ती खूप मेहनती आहे. ट्रेनिंगसाठी ती पहाटे 4 वाजता उठायची. तिने गावातील मैदानात तरुणांसोबत एकट्याने धावण्याचा सराव सुरू केला. सप्टेंबर 2022 मध्ये तिने अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात भरतीसाठी अर्ज केला. अधिकाऱ्यांनी तिची फिटनेस पाहून तिची निवड केली. देशाच्या रक्षणाची शपथ घेऊन सैन्यात भरती होण्यासाठी तिने खूप तयारी केली आहे.'


वडिलांची 12 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज


हिशा एका सामान्य रिक्षाचालकाची मुलगी आहे. तिच्या वडिलांची 12 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे. हिशाच्या वडिलांच्या उपचारासाठी रिक्षा आणि जमीनही विकली आहे. हिशाच्या आईने सांगितले की, 'आम्ही आम्ही जमीन आणि रिक्षा विकून माझ्या पतीच्या कर्करोगाचा उपचार करत आहोत. कर्करोगाच्या उपचाराचा मोठा खर्च आहे, पण आम्हाला आमच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे.'


सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा


हिशाच्या वडिलांची 12 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे. हिशाच्या वडिलांच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये खूप खर्च होत आहे. त्यामुळे हिशाच्या आईला सरकारकडे आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. हिशाच्या वडिलांच्या उपचारासाठी त्यांनी रिक्षा आणि जमीनही विकली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Sania Mirza : देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट होणार सानिया मिर्झा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI