Explosion in Firecracker Factory :  हिमाचल प्रदेशातील (Explosion in Himachal Pradesh) उना जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. उना येथील ताहलीवाल येथे असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात प्रथम स्फोट झाला आणि स्फोटानंतर मोठी आग लागली. या अपघातात 10-15 महिला भाजल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 6 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर 10 जण गंभीर जखमी आहेत. सध्या आग विझवण्यात आली आहे.


PM मोदींकडून शोक व्यक्त


उना जिल्ह्यातील अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शोक व्यक्त केला आहे. मोदी म्हणाले, 'हिमाचल प्रदेशातील उना येथील कारखान्यात घडलेली दुर्घटना दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी मी प्रार्थना करतो.


 






जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले


स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस अधिकारीही घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. 





 





महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha