Corbevax Vaccine DGCI Approval : 12 वर्षांवरील मुलांसाठीच्या Corbevax या लसीला आपत्कालीन मान्यता देण्यात आली आहे. हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' (Biological E) कंपनी निर्मित असलेली 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) या लसीला औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी आपत्कालीन मन्यता दिली आहे. त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. याआधी भारतात 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. आता 12 वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल कोवोवॅक्स  (COVOVAX) लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.

Continues below advertisement


कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून भारतासह जगभरात हाहा:कार माजवला होता. अनेकांचा मृत्यू झाला होता. लहान मुंलानाही कोरोनाचा विळखा झाला होता. 2021 च्या सुरुवातीपासून भारतात कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांना देण्यात आली होती. जानेवारी 2022 मध्ये 15 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरु झाले होते. आता 12 वर्षांवरील मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी 12 वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल. निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाऊ शकते, असे सांगितले होते. लसीकरणासाठी आणखी लोकांना सामाविष्ट करयला हवे, असेही त्यांनी सांगितले होते. 




कॉर्बेवॅक्स सर्वात स्वस्त लस -
आतापर्यंत भारतात फायझर, मोडर्ना, कोविशिल्ड, स्पुतनिक व्ही, कोवॅक्सिन या लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच कार्बेवॅक्स लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. कोविडच्या इतर लसांप्रमाणेच कॉर्बेवॅक्सचे दोन डोस घ्यावे लागतील. मात्र ही लस स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कार्बेवॅक्स ही लस तयार करण्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च आहे. पण ही बाजारात 250 रुपयांत उपलब्ध होईल. बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लसीपासून नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही, तर लोकांची सेवा करणे हे आहे. यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले आहेत.