PM Kisan Yojana : तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (PM Kisan Samman NIdhi) आपल्या नावाची नोंदली केली असून 11व्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने (Central Government) पंतप्रधान किसान सन्मान निधीत दोन महत्वाचे बदल केले आहेत. या योजनेत सरकारने नेमके काय बदल केले आहेत आणि 11व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.           


ई-केवायसी करणे झाले बंधनकारक 


आधी पंतप्रधान किसान पोर्टलला भेट देऊन, कोणीही त्यांच्या हप्त्याच्या स्टेटसबद्दल माहिती मिळवू शकत होता, परंतु आता यासंबंधित नियमात बदल करण्यात आले आहेत. आता पंतप्रधान किसान पोर्टलवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमेचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतरच तुम्ही स्टेटस आणि पुढील तपशील पाहू शकाल. याशिवाय यात करण्यात आलेल्या दुसऱ्या बदलात लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लवकरच आपले ई-केवायसी अपडेट करा. तुम्ही याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.         


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता केंद्र सरकार 11 व्या हप्त्यातील रक्कम होळीनंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. दरम्यान, किसान सहाय्यता निधीच्या अंतर्गत दरवषी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची रक्कम आर्थिक सहाय्यता म्हणून दिली जाते. ही रक्कम सरकार तीन हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात 4-4 महिन्यांनी जमा करते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये जमा केले जातात.    


महत्त्वाच्या बातम्या: