Karnataka Hijab Row : कर्नाटकात न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण तापलंय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत. आता हिजाब प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तसच पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहे.
मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा होणार आहे. हिजाबवरून झालेल्या वादामुळे कर्नाटकातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कर्नाटक हायकोर्टाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. हायकोर्टाने म्हटले आहे की, शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करावीत. तसेच पुढील निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी कोणतेही धार्मिक पोशाख घालू नये. राज्यात शांतता राखली पाहिजे.
या अगोदर गुरूवारी सकाळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस रितु राज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली जस्टिस कृष्ण एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांना सहभागी करत हायकोर्टाने फुल बेंत म्हणजे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ गठित करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सुप्रिम कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाची सध्या वाट पाहत आहे.
हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून चर्चेत
हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
कर्नाटकात तीन दिवस शाळा, महाविद्यालये बंद
कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे. हिजाब समर्थक ग्रुप हिजाब घातल्याने मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बंधनांचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटानांनी हिजाबचा विरोध करत हिंदू विद्यार्थ्यांना देखील भगव्या रंगाची शाल आणि टोपी वाटत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Hijab Controversy : हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...
- Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाबबंदीच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न; माकपचा आरोप
Hijab Controversy: RSS च्या मुस्लिम आघाडीकडून कर्नाटकमधील 'त्या' मुलीचे कौतुक म्हणाले....