योग सोडून मोदी आईच्या भेटीला, केजरीवालांकडून फिरकी
एबीपी माझा वेब टीम | 10 Jan 2017 10:52 AM (IST)
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दिनक्रम अतिशय काटेकोरपणे पाळतात. मोदी दिनक्रमात कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाहीत. मात्र आईच्या प्रेमापुढे पंतप्रधानांना त्यांचा दिनक्रम बदलावा लागला. रोजच्या कामांना फाटा देत पंतप्रधान मोदी आई हिराबेन यांना भेटण्यासाठी गेले. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सध्या गुजरातमध्येच आहेत. "योग सोडून आईला भेटण्यासाठी गेलो. सकाळ होण्याआधी आईसोबत नाश्ता केला. अतिशय उत्तम वेळ एकत्र घालवला," असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं. https://twitter.com/narendramodi/status/818638247165247488 मोदींची आई हिराबेन गांधीनगरमध्ये धाकटा मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत राहतात. आधीही पंतप्रधान जेव्हा गुजरातमध्ये आले तेव्हा आईला भेटायला गेले होते. मोदी 66व्या वाढदिवसालाही आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या या ट्वीटवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फिरकी घेतली. मोदींच्या ट्वीटला रिप्लाय करताना केजरीवालांनी लिहिलं आहे की, "मी माझ्या आईसोबतच राहतो. नियमित त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मी गाजावाजा करत नाही. राजकारणासाठी मी आईला बँकेच्या रांगेतही उभं करत नाही." https://twitter.com/ArvindKejriwal/status/818679781457858561 https://twitter.com/ArvindKejriwal/status/818677534124408832