Henley Passport Index 2023 : हेन्ली पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index) मध्ये आता सिंगापूर (Singapore) देशाने बाजी मारली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, सिंगापूर आता जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेला देश ठरला आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच हेन्ली पासपोर्ट इंडेक्सध्ये (Henley Passport Index) जपानने पहिल्या क्रमांकाचं रँकिंग गमावलं आहे. आता जपान या यादीत तिसऱ्या क्रमांकावरल पोहोचला आहे. हेन्ली पासपोर्ट सर्वेक्षणानुसार, सिंगापूर देशाच्या पासपोर्टवर  227 पैकी 192 देशांमधील नागरिकांना आता व्हिसा-मुक्त प्रवास करता येतो. भारताने यादीत पाच क्रमांकाने उडी मारली आहे.


जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट


सिंगापूरने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (Strongest Passport) असलेल्या जपानला मागे टाकून पहिलं स्थान बळकावलं आहे. सिंगापूरच्या पासपोर्टवर 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास आणि प्रवेशाला परवानगी दिली आहे. नवीन हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारताने आपल्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली आहे. 


भारतीयांना 57 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश


भारतीय पासपोर्ट धारकांना (Indian Passport Holder) इंडोनेशिया (Indonesia), थायलंड (Thailand) आणि रवांडा (Rwanda) यासारख्या 57 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश आणि व्हिसा ऑन अरायव्हल आहे. दरम्यान, भारतीय नागरिकांना चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि संपूर्ण युरोपियन युनियन सारख्या देशांमध्ये प्रवासासाठी व्हिसा आवश्यक आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना जगभरातील 177 देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता आहे. यामुळेच भारत या यादीत खाली आहे.


'या' यादीत भारत कोणत्या स्थानावर?


लंडनस्थित इमिग्रेशन कन्सल्टन्सी हेन्ली अँड पार्टनर्सने प्रकाशित केलेल्या नवीन क्रमवारीनुसार, पाच वर्ष अव्वल स्थानी राहिल्यानंतर, जपान (Japan) तिसर्‍या स्थानावर घसरला असण्याचं कारण म्हणजे त्याच्या पासपोर्टवर व्हिसाशिवाय प्रवेश करण्याच्या देशांची संख्या कमी झाली आहे. या यादीतील भारतीय पासपोर्टचा (Indian Passport) क्रमांक पाच स्थानांनी सुधारला आहे. आता नवीन हेन्ली पासपोर्ट यादीत भारत (Henley Passport India Ranking) 80 व्या क्रमांकावर आहे. भारतीय (India) पासपोर्टद्वारे 57 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करता येतो.


हेन्ली पासपोर्ट इंडेक्स काय आहे?


'हेन्ली पासपोर्ट इंडेक्स' हे पासपोर्ट रँकिंग आहे. पासपोर्टवर जितक्या देशांमध्ये व्हिसा-मुक्त (Visa Free Travel) प्रवास करता येतो, त्याआधारावर ही यादी ठरवली जाते. त्यामुळे सिंगापूर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कारण, सिंगापूरच्या पासपोर्टवर 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश करण्यास परवानगी आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Indian Passport : भारतीय पासपोर्ट चार रंगात... प्रत्येक रंगाच्या पासपोर्ट धारकांना मिळते विशेष सुविधा