राम रहीमवर बलात्कार म्हणजे भा.दं.वि. कलम 376 नुसार आणि धमकावल्याप्रकरणी कलम 506 अंतर्गत आरोप सिद्ध झाला आहे. हे बलात्कार प्रकरण 2002 सालचं आहे. त्यामुळे दिल्लीतील 2013 सालच्या बलात्कार प्रकरणानंतर कडक करण्यात आलेल्या कायद्यानुसार राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार नाही. मात्र पीडितेवर धर्मगुरुकडून अत्याचार आणि 2 महिलांवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालय 10 वर्षांपर्यंत शिक्षा देऊ शकतं.
याशिवाय कलम 506 साठीही 7 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाऊ शकते. न्यायाधीश रोहतक जेलमध्ये जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार आहेत. जेलमधील या न्यायालयाला सत्र न्यायालयाचा दर्जा असल्याने राम रहीमला हायकोर्टात निर्णयाला आव्हान देता येईल. निर्णयाची प्रत लगेचच राम रहीमच्या वकिलाकडे दिली जाईल. यानंतर राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. दरम्यान जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं.
राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.
हिंसाचारानंतर हरियाणा सरकार खडबडून जागं
बाबा राम रहीमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर हरियाणामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यामुळे हरियाणा सरकारने उद्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी सेनेच्या 28 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
अजित डोभाल यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक
हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा केला आहे.
इंटरनेट सेवा बंद
हरियाणाच्या गृहविभागाने 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट, एसएमएस आणि सर्व वायफाय हॉटस्पॉट बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मोबाईल व्हॉईस कॉलिंगवर याचा काहीही परिणाम होणार नाही.
संबंधित बातम्या
राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं
गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?
व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला
बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली
बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू
भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन
अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?
कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात
राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट
बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी