सिरसा (चंदीगड) : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचं सिरसामधील आश्रम रिकामं करण्यासाठी आज मोठी कारवाई करण्यात आली. भारतीय सैन्य डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसलं आहे. आश्रमाबाहेर सैन्य, निमलष्करी दल, पोलिस आणि शीघ्र कृती दलाचे जवान इथे दाखल झाले आहेत.


हे आश्रम डेरा सच्चा सौदाचं मुख्यालय आहे. आश्रमात बसलेल्या समर्थकांना बाहेर काढून ते सील करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. आश्रमात हजारो समर्थक असून त्यात महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना बाहेर काढण्याचं आव्हान सैन्यासमोर आहे.

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी 15 वर्षांनी दोषी ठरल्यानंतर बाबा राम रहीमच्या समर्थकांनी अक्षरश: हैदोस घातला. हरियाणा आणि पंजाबमध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला असून 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 29 पंचकुला आणि 2 सिरसामधील आहे.



राम रहीमच्या अनुयायींनी घातलेल्या हैदोसामुळे नाराज झालेल्या पंजाब-हरियाणा हायकोर्टाने डेराची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय सुनावला. त्यानंतर आता बाबा राम रहीमची देशभरातील आश्रमं सील केली जात आहेत.

हरियाणातील राम रहीमची आतापर्यंत 36 आश्रमं सील करण्यात आली आहेत. यामध्ये करनाल, अंबाला, कॅथल आणि कुरुक्षेत्रच्या आश्रमांचा समावेश आहे. करनालमध्ये पोलिसांनी राम रहीमच्या 15 समर्थकांना अटक केली आहे. यांच्याकडून एका अॅम्ब्युलन्समधून पेट्रोल आणि लाठ्याकाठ्या जप्त केल्या आहेत.

डेरामध्ये राम रहीमच्या महिला समर्थकही आहेत. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा पथकांमध्ये महिलांचाही समावेश आहे. सैन्याच्या कारवाईत कोणीही अडथळा आणल्यास त्यांना त्याक्षणी गोळी मारली जाईल, असं सैन्याकडून सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या

गुरमीत राम रहीमनंतर 'ही' महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?

व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला

बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली

बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू

भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन

अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?

कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात

राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट

बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी