चेन्नई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. हर्षवर्धन म्हणाले की, येत्या काही दिवसात 'आपल्या देशवासियांना' लस उपलब्ध होईल. सरकार लसीकरण कार्यक्रमाची सर्व माहिती राष्ट्रीय स्तरापासून ते तळागाळापर्यंत उपलब्ध करुन देणार आहे. चेन्नई येथील रूग्णालयात सुरु असलेल्या ड्राय रनला भेट देण्यासाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही लस प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना आणि नंतर फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे.


आरोग्यमंत्री म्हणाले, “कमी कालवधीत लस तयार करण्यात भारताने चांगली आघाडी घेतली आहे. येत्या काही दिवसात आम्ही ही लस आपल्या देशवासियांना देऊ शकू. प्रथम आरोग्य कर्मचारी आणि नंतर फ्रंटलाइन कामगारांना ही लस दिली जाईल. ड्राय रन वेळी लाखो आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे.'


Corona Update | राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण; पिंपरी- चिंचवडमध्ये दहशत


आरोग्यमंत्र्यांनी आज ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी चेन्नईत दाखल झाले. त्यांनी काही केंद्रांना भेट दिली. ड्राय रनचा दुसरा टप्पा आज देशातील 33 राज्यांतील 736 जिल्ह्यात राबविला जात आहे.


एकीकडे आरोग्यमंत्र्यांनी आत्मविश्वास दिला आहे, तर दुसरीकडे सीरम संस्थेनेही पूर्ण तयारी केली आहे. सीमार संस्थेचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव म्हणाले, "मंगळवारी रात्री पुणे विमानतळ कोविड लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, ही जगातील सर्वात मोठी प्रक्रिया आहे. दरम्यान, सीरम संस्था केंद्र सरकारच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करीत आहे. आमच्याकडे पाच कोटी डोस तयार असून ऑर्डरप्रमाणे आम्ही लसीचा पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Corona Vaccine Dry Run | मुंबईत कोरोना लसीकरणाचं 'ड्राय रन'; 'एबीपी माझा'चा स्पेशल रिपोर्ट