PM Narendra Modi France And UAE Visits : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच फ्रान्स आणि UAE दौऱ्याहून भारतात आले. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या अलीकडील दौर्‍यांना 'यशस्वी' म्हणून संबोधले आहे. तसेच, या भेटींचे काही ठोस परिणाम देखील येणाऱ्या काळात दिसून येतील असेही ते म्हणाले. 


फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या 'यशस्वी' भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (15 जुलै) मायदेशी परतले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रविवारी (16 जुलै) दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले, "पंतप्रधानांचा फ्रान्स आणि यूएई दौरा यशस्वी झाला आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले."


भारताच्या यशाची कहाणी - हरदीप सिंग पुरी


मे महिन्यापासून पंतप्रधानांच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि जपानच्या अधिकृत दौऱ्यांचा संदर्भ देत हरदीप सिंग पुरी म्हणाले की, या सर्व भेटींचे यश 'भारताची कहाणी' आहे. "निश्चितपणे या सर्व भेटींचे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय क्षेत्रात खूप सकारात्मक परिणाम झाले आहेत," असेही ते म्हणाले.


"बाहेरील जगाशी आमच्या संवादाची गती आणि G-20 शिखर परिषदेच्या आधीच्या आठवड्यात ज्या प्रकारचे कार्यक्रम आखले गेले आहेत, मला वाटते की हे जगाच्या अनेक भागांमध्ये भारताची कहाणी सांगत आहे," ते म्हणाले.''


केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांचे यश सांगितले


पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्याबाबत ते म्हणाले, ही केवळ भेट नव्हती, तर ती ठोस परिणामांवर आधारित होती. भारत आणि फ्रान्सने अंतराळ, नागरी विमान वाहतूक, संग्रहालय, पेट्रोलियम आणि व्यापार यांसारख्या विविध क्षेत्रांत अनेक करारांवर स्वाक्षरी केली. याशिवाय पुढील 25 वर्षांतील भागीदारीसाठी 'होरायझन 2047' नावाचा रोडमॅपचेही अनावरण करण्यात आले.


भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी बँडच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याच्या तीन शाखांच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फ्रान्समध्ये, पंतप्रधान 'बॅस्टिल डे' परेडचे सन्माननीय पाहुणे होते. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' देखील प्रदान करण्यात आला.


पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेच्या रेटिंगचा उल्लेख 


पुरी म्हणाले, "अलीकडेच काही इतर सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि विविध देशांचे सन्मान पंतप्रधानांना देण्यात आले. यामध्ये इजिप्तचा 'ऑर्डर ऑफ नाईल' आणि 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर' हा फिजीचा सर्वोच्च सन्मान आहे." 


महत्त्वाच्या बातम्या : 


Opposition Parties Meeting: 24 पक्ष, 6 अजेंडे... विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक; डिनरसाठी शरद पवार- ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित