Hapur Boiler Explosion : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर येथील (Hapur) धौलानामधील (Dhaulana) केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 21 लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला अशी माहिती स्थानिकांनी दिली.  इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या एका कंपनीत हा स्फोट झाला होता. रिपोर्टनुसार, केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाचा परिणाम परिसरातील सुमारे 30 जणांवर झाला आहे. हापूरचे पोलीस अधीक्षक दीपक भुकर यांनी सांगितले की, जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हापूरच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी सांगितले की, धौलानाच्या संबंधित इंडस्ट्रीजला इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याचा परवाना मिळाला आहे. अशा परिस्थितीत ही स्फोटक सामग्री कशी बनवली जात होती, याचा तपास करून लवकरच त्यावर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर याप्रकरणी धौलाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपींकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आयपीसीच्या कलम 286, 287, 304, 308, 337 आणि 338 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारखान्यात फटाके तयार होत असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.






मेधा रूपम यांनी सांगितलं की, फॉरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ते काही नमूने गोळा करत आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, औद्योगिक क्षेत्रमधील प्रत्येक कारखान्याची तपासणी केली जाईल. तपासात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जखमींना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यातील काहींना सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आल्याचे  मेधा रूपम यांनी सांगितले.


हेही वाचा: