- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
भारत
Republic Day 2021 LIVE Updates | शेतकरी आंदोलनात फूट; राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार
Republic Day 2021 LIVE Updates | शेतकरी आंदोलनात फूट; राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार
Happy Republic Day 2021 Parade Rajpath LIVE Updates: देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
27 Jan 2021 06:41 PM
गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा
शेतकरी आंदोलनात फूट; राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर टीका करत शेतकरी नेते व्ही. एम. सिंग यांची घोषणा
शेतकऱ्यांनी हिंसा केली नाही. भाजप सरकारच्या दिल्ली पोलिसांनी हिंसा केली : अशोक ढवळे
दिल्लीत जे घडलं ते लाजिरवाणं आणि घृणास्पद. चार-पाच लोकांमुळे आंदोलनाला गालबोट लागलं. हिंसा घडवणारे आमच्या संघटनेचे नव्हत : योगेंद्र यादव
शांतता हीच आपली ताकद आहे. दिल्लीतील परिस्थिती हाताबाहेर नाही : अजित नवले
हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही : राहुल गांधी
हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. कोणालाही दुखापत झाली तरी नुकसान आपल्या देशाचंच होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे मागे घ्या, असं ट्वीट काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही : राहुल गांधी
हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. कोणालाही दुखापत झाली तरी नुकसान आपल्या देशाचंच होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे मागे घ्या, असं ट्वीट काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
आंदोलक शांततेत माघारी परततील : राकेश टिकैत
आंदोलन शांततामय वातावरणातच सुरु राहिल. आंदोलक शांततेत माघारी परततील. पोलिसांकडे रिंग रोडची परवानगी मागितली होती. त्यांनी शेतकऱ्यांची संख्या पाहून परवानगी द्यायला हवी होती. ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आंदोलनात कोणतीही हिंसा होणार नाही, अशी माहिती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली
काही आंदोलक लाल किल्ला परिसरात दाखल
काही आंदोलक शेतकरी लाल किल्ला परिसरात दाखल झाले, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केला. परंतु आंदोलक दुसऱ्या मार्गाने लाल किल्ला परिसरात पोहोचले. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण मिळताच दिल्लीतील आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.
शेतकरी आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळं आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन होईल, असं सांगणाऱ्या शेतकऱ्यांचं आक्रमक रुप आज दिल्लीत पाहायला मिळत आहे.
ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्लीच्या वेशीपाशी पोहो आहेचले आहेत. दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलकांकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला जात आहे.
दिल्लीच्या पोलीस मुख्यालयाबाहेर पोलीस आणि शेतकरी एकमेकांसमोर उभे ठाकले. आंदोलक शेकऱ्यांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न. काही शेतकरी इंडिया गेटच्या दिशेनं निघाले. पोलिस- शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष
सिंघु, गाझीपूर वेशीवर शेतकरी-पोलीस आमनेसामने
सिंघु आणि गाझीपूर सीमेवर शेतकरी आमनेसामने आले आहेत. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीमारही सुरु आहे.
सिंघु, गाझीपूर वेशीवर शेतकरी-पोलीस आमनेसामने
सिंघु आणि गाझीपूर सीमेवर शेतकरी आमनेसामने आले आहेत. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीमारही सुरु आहे.
रायगडच्या रोह्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एक किमी लांबीचा तिरंगा तयार करुन रॅली
देशाच्या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील रोहा येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुमारे एक किलोमीटर लांबीचा तिरंगा तयार करण्यात आला. तर, रोहा शहरात काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शाळकरी मुलांसोबत शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यामुळे, संपूर्ण शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण होऊन भारतमाता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी, रायगडचे खासदार सुनील तटकरे , आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.
आंदोलक शेतकऱ्यांची दिल्लीच्या दिशेनं कूच. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक. पोलिसांच्या बॅरिगेटींगला जुमानणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका
सिंघू बॉर्डरवरुन ट्रॅक्टर परेडला सुरुवात, टिकरी सीमेवर शेतकऱ्यांनी तोडले बॅरिगेट्स. राजपथावर सैन्याच्या पथसंचालनाचा सुरुवात झालेली असतानाच तिथं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली.
संतवाणी राजपथावर दुमदुमली. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर लक्ष वेधून गेला. ज्ञानोबा- माऊलीचा दिल्लीतही गजर
राजपथावर चित्ररथ येण्यास सुरुलात. उपस्थितांचा उत्साह शिगेला.
सलामी मंचासमोरून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या संचलानाचा सुरुवात. जय भारतीच्या घोषानं परिसर दुमदुमला
दिल्लीतील राजपथावर दिमाखदार पथसंचलनाला सुरुवात. भारताच्या सैन्यबळाचं सुरेख आणि शिस्तबद्ध संचलन.
राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाच्या नेते तसंच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण, परदेशी पाहुण्यांविना यंदा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा, राजपथावर परेडला सुरुवात
शहिदांना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान राजपथावर पोहोचले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा राजपथावर दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर दाखल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून मोदींचं स्वागत, तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद थोड्याच वेळात राजपथावर दाखल होणार
मुंबईतील आझाद मैदानात यमुना जाधव या 73 वर्षीय आजींच्या हस्ते ध्वजारोहण, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांची उपस्थिती, मोर्चेकरी शेतकरी आज आपापल्या गावी परतणार
दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्याला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहिदांना आदरांजली. मोदी राजपथाकडे रवाना
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर पथसंचलानाला सुरुवात
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर पथसंचलानाला सुरुवात
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळात आजच्या प्रजासत्ताक दिनी संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले जात आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळात रोज संविधान प्रास्ताविक वाचण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 26 जानेवारी 2020 पासून याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश होते. पण संविधान वाचनाची गतवर्षी पुरेशी अंमलबजावणी झाली नव्हती. 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन' म्हणून राज्य सरकारला घोषित केला आहे. सरकारी कार्यालयांतही आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले. राज्य सरकारने गतवर्षी 21 जानेवारीला 26 जानेवारीपासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळात संविधान प्रास्ताविका वाचण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत झाले होते. संविधानजागृतीसाठीचा 'संविधान ओळख' हा उपक्रम देशात सर्वप्रथम 2005 मध्येच नागपुरात राबवण्यात आला. राज्यात 2008 पासून आणि नंतर देशभरात 2015 पासून हा उपक्रम सुरु झाला. नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये 2005 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होत होती, तरी दरम्यानच्या काळात प्रशासनाने अंमलबजावणीत गांभीर्य न दाखवल्यानेच संविधान प्रास्ताविका वाचनात खंड पडला होता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्वीट केलं आहे की, "देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!''
दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. कर्नाल रोडवर कंटेनर लावले आहेत. सिंघु आणि टिकरी सीमेवर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मध्य दिल्लीत रॅली काढण्यास परवानगी दिलेली नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीमध्ये तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारो ट्रॅक्टरचा समावेश असू शकतो. याचा पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी देशाच्या राजधानीत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
पार्श्वभूमी
Republic Day 2021 : संपूर्ण देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंगीकारलं होतं. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड काढण्याचाही निर्णय घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाच्या सैन्याची ताकद पाहायला मिळणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी भारतीय हवाई दलात नव्याने सामील झालेली राफेल विमानही परेडमध्ये प्रात्यक्षिके करताना दिसतील. यासोबतच टी-90 टँक आणि सुखोई-30 एमके आय लढाऊ विमानंही या संचलनात सामील असतील.
सरंक्षण मंत्रालयकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे रथ पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सरंक्षण मंत्रालयाच्या सहा रथही यंदा परेडमध्ये असतील. निमलष्करी दलाचे 9 रथ राजपथावर संचलन करतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया मूव्हमेंटसारख्या अभियानांचे रथही पाहायला मिळतील.
शेतकऱ्यांचीही ट्रॅक्टर रॅली
दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नवे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.
ट्रॅक्टर मार्चच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.