HAL HLFT-42 Hanuman Image : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने एअरशोमध्ये प्रदर्शित केलेल्या HLFT-42 विमानाच्या मॉडेलवरील हनुमानाचा फोटो (Hanuman Photo) गायब झाला आहे. एचएएलने (HAL) एअरो शो 2023 मध्ये 13 फेब्रुवारीला आधुनिक लढाऊ ट्रेनर विमान HLFT-42 प्रदर्शित केलं. या विमानाच्या शेपटीवर हनुमाना फोटो होता. आता दुसऱ्याच दिवशी या विमानावरील फोटो हटवण्यात आला आहे. बंगळुरुमध्ये चौदाव्या एअरो शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामधील हनुमानाचा फोटो असणारं विमान चर्चेत आलं होतं. आता यावरील हनुमानाचा फोटो गायब झाला आहे.


HLFT-42 विमानावरील हनुमानाचा फोटो गायब


एअरो इंडिया 2023 (Aero India 2023) शोमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केलेल्या या सुपरसॉनिक ट्रेनर विमानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या ट्रेनर एअरक्राफ्टला नाव HLFT-42 असं नाव देण्यात आलं आहे. हे विमान HAL ने प्रगत लढाऊ ट्रेनर विमान म्हणून सादर केलं. या विमानाच्या मागील भागावर हनुमानाचं चित्र होतं, त्याखाली 'द स्ट्रोम इज कमिंग' असं लिहिलं होतं. पण आता HLFT-42 विमानावरील हनुमानाचा फोटो गायब झाला आहे.






'द स्ट्रोम इज कमिंग' 


HAL चे सुपरसॉनिक ट्रेनर लढाऊ विमान हे भारतातील पहिले सुपरसॉनिक ट्रेनर विमान आहे. याचं मॉडेल तयार असून ते एअरो इंडिया शोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. हे विमान तयार झाल्यानंतर भारतीय लढाऊ वैमानिक त्यावर पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने उडवण्याचे प्रशिक्षण घेतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी ट्विटरवर विमानाचा फोटो पोस्ट करत म्हटलं की, 'वादळ येत आहे! जय बजरंगबली. एरो इंडिया शोमध्ये HAL चे HLFT-42'






आशियातील सर्वात मोठा एअर इंडिया शो 2023


आशियातील सर्वात मोठ्या एअर शोचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे पंतप्रदान मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात देशविदेशातील हवाई शस्त्रांचंल प्रदर्शन आणि वेगवेगळ्या हवाई कसरती पाहायला मिळत आहे. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत या एअर शो सुरु असेल. यामध्ये 80 हून अधिक देश सामील होणार आहेत.