Gyanvapi Mosque ASI Survey : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या ASI (Archaeology Survey Of India) परिसरात पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात मूर्ती सापडल्याचा दावा हिंदू पक्षांनी केला आहे. ज्ञानवापी परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजता सर्वेक्षणाला सुरुवात झाली. कडेकोट बंदोबस्तात, एएसआयची टीम आली आणि मुख्य आवारातून घुमट, व्यासजी तळघर आणि इतर भागात जाऊन तपास केला. तळघर सर्वेक्षणादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. तळघरात खंडीत मूर्ती, त्रिशूळ आणि भिंतींवर कमळाच्या कलाकृती सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने दावा केला आहे.
ज्ञानवापीच्या तळघरात हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा
आज रविवारी (6 ऑगस्ट, 2023) ज्ञानवापी मशिद परिसर सर्वेक्षणाचा तिसरा दिवस आहे. हे सर्वेक्षण सकाळी 8 वाजता सुरू होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. शनिवारी, ज्ञानवापी येथील ASI सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी हिंदू पक्षाच्या वकिलांनी दावा केला की, तळघरात मूर्तींचे अवशेष आणि तुटलेले खांब सापडले आहेत. एएसआयला असे अनेक पुरावे मिळतील, ज्याच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीवरून ज्ञानवापीचे धार्मिक स्वरूप बदलल्याचं स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
कडेकोट बंदोबस्तात ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण
कडेकोट बंदोबस्तात, एएसआयच्या टीमने मुख्य आवारातून घुमट, व्यासजींच्या तळघर आणि इतर भागात जाऊन तपास केला. तळघर सर्वेक्षणादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. माती, विटा, दगडाचे नमुनेही घेण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या मदतीने, बांधकामाचा कालावधी आणि वय निश्चित केलं जाईल. शनिवारी सकाळी सुरु झालेलं सर्वेक्षण सायंकाळी पाच वाजता संपलं तेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक ज्ञानव्यापीच्या आवारातून बाहेर आले.
हिंदू पक्षाचा दावा काय?
ज्ञानव्यापीच्या सर्वेक्षणाबाबत हिंदू पक्षाकडून दावा करण्यात आला की, तळघरा 4 फुटाची मूर्ती सापडली आहे. मूर्तीवर काही कलाकृती आहेत. मूर्तीशिवाय 2 फुटांचे त्रिशूल आणि 5 कलशही सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तळघराच्या भिंतींवर कमळाच्या कलाकृती आढळल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानवापी संकुलाच्या पश्चिमेकडील भिंतीवर अर्धा प्राणी आणि अर्धी देवता असलेली मूर्ती आढळली, तसेच तळघरात तुटलेल्या मूर्ती आणि खांबही सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.
सर्वेक्षणावेळी व्हिडीओ रेकॉर्डिंग
शनिवारी ज्ञानव्यापी मशिद सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम पक्षाच्या प्रतिनिधीनींही सहभाग घेतला होता. तळघराचा दरवाजा उघडल्यावर सर्वेक्षण विभागाचं पथक आत पोहोचलं. सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात सुमारे 61 लोक उपस्थित होते. भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकासोबत हिंदू पक्ष, हिंदू पक्षाचे वकील, मुस्लिम पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होते. सर्वेक्षण पथकाने संपूर्ण मशिदीची रचना, भिंती आणि आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा केले. आवारातील तळघर आणि तीन घुमटाखालील सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला. हिंदू पक्षाने सर्वेक्षणावेळी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे.