Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज वारणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. या प्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, " मुस्लिम पक्षाच्या बाजूच्आ आदेशाच्या याचिकेवर 7 11 सीपीसी अंतर्गत याचिकांवर 26 मे रोजी सुनावणी होईल." न्यायालयानं दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर सुरू झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत, त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती. 


न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.


ज्ञानवापी मशीद प्रकरणावर काय आहेत मागण्या,


हिंदू पक्षाने काय म्हटलं?


1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी
2. वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी
3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी
4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी
5. वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी


मुस्लिम पक्षाची बाजू


1. वजूखाना सील करण्यास विरोध


2.  1991 कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि  खटल्यावर प्रश्नचिन्ह 


महत्त्वाच्या बातम्या: