Kangana Ranaut : ज्ञानवापी प्रकरणावर कंगना म्हणाली..
देशामध्ये सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणीची चर्चा सुरू आहे. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) वाराणसीमधील (Varanasi) काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. (Photo:kanganaranaut/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या कंगना ही तिच्या धाकड चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. धाकड (Dhaakad) चित्रपटाच्या टीमसोबत कंगना वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेली. यावेळी कंगनानं मंदिरामध्ये पूजा केली. यावेळी कंगनाला ज्ञानवापी प्रकरणाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. (Photo:kanganaranaut/ig)
कंगनाला जेव्हा ज्ञानवापी प्रकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'जसे मथुरेच्या कणा कणामध्ये भगवान कृष्ण आहेत. तसेच जसे अयोध्येच्या कणा कणामध्ये राम आहेत. तसेच काशीच्या कणा कणीमध्ये महादेव आहेत. त्यासाठी कोणत्याही रचनेची गरज नाहीये. ' त्यानंतर कंगना 'हर हर महादेव' असं म्हणाली. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Photo:kanganaranaut/ig)
कंगना ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते. कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. तिनं केलेली वक्तव्य चर्चेत असतात.(Photo:kanganaranaut/ig)
कंगनाच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होत असते. कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. (Photo:kanganaranaut/ig)
या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. (Photo:kanganaranaut/ig)