Gyanvapi Masjid Survey : 14 मेपासून सुरू असलेले ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणाचे काम मंगळवारी संपले. आता बुधवार, 17 मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध पक्षांकडून सर्व प्रकारचे मोठे दावे केले जात आहेत. ज्यामध्ये हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की, मशिदीत सर्वेक्षण करताना 12 फूट 8 इंच शिवलिंग सापडले आहे. ज्यानंतर हिंदू पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.
हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला, परिसर तात्काळ सील करण्याचे आदेश
आता शिवलिंग मिळण्याच्या दाव्याबाबत हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते ठिकाण तात्काळ सील करावे, तसेच त्या ठिकाणी कोणाच्याही प्रवेशावर बंदी घालण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले. दुसरीकडे, न्यायालयात अहवाल सादर होईपर्यंत मशिदीतील वाजुखानाचे जतन करण्याची तयारी हिंदू पक्षाने केली आहे.
हिंदू पक्षाचा दावा
मशिदीतील वाजुखानाच्या अगदी मध्यभागी 30 बाय 30 फूट एवढी शिवलिंग सापडल्याचे हिंदू सांगतात. ज्याबद्दल हिंदू ठामपणे दावा करत आहे. तर मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे की, हा कारंज्याचा भाग आहे. दरम्यान, मशिदीच्या वाजुखान्यात पाणी भरले आहे. या परिसरात सीआरपीएफचे सुरक्षा कर्मचारी असतील. जेणेकरुन कोणीही वाजुखान्याशी छेडछाड करू नये. मुस्लीम पक्षाचे वकील मुमताज अहमद म्हणाले की, हिंदू पक्षाच्या म्हणण्यानुसार निर्णय घेता येणार नाही, दरम्यान मशिदीत असे काहीही आढळले नाही.
संबंधित बातम्या
Gyanvapi Masjid Survey : ज्ञानवापी मशिद सर्वेक्षण प्रकरण न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडण्यात यावं, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Gyanvapi Masjid सर्वेक्षणात सापडल्या स्वस्तिक, ओमच्या खुणा आणि बरंच काही! जाणून घ्या सविस्तर
Gyanvapi Masjid Survey : ज्ञानवापी मशिद सर्वेक्षणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर न्यायालयाचा मोठा निर्णय, दिले 'हे' आदेश