Deployment of Hindu Kashmiri employees : अलीकडेच काश्मिरी पंडित असरणारे सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या सरकारी कार्यालयात घुसून ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी आता मोठं पाऊल उचललं आहे. काश्मीरमध्ये काम करत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हे आणि तहसील मुख्यालयात काम दिले जाणार असल्याची माहिती उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. तसेच त्यांना पोलिसांची सुरक्षा देखील पोहोचवणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले करत आहेत. या घटनेला सरकारने गांभीर्याने घेत आता काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, पंतप्रधान पॅकेज अंतर्गत काश्मीरमध्ये काम करत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हे आणि तहसील मुख्यालयात काम दिले जाणार आहे. यासोबतच जम्मू-काश्मीर पोलीस काश्मिरी हिंदू कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण सुरक्षा पुरवतील. पंतप्रधान मदत पॅकेज अंतर्गत नियुक्त केलेल्या जवानांच्या कल्याण आणि सुरक्षेशी संबंधित सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात 859 कर्मचारी सुरक्षित जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात येणार
जम्मू-काश्मीर सरकारच्या नव्या रणनीतीअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून 859 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना 8 ते 10 दिवसांत सुरक्षित जिल्ह्यांमध्ये किंवा तहसीलमध्ये तैनात केले जाईल. एवढेच नाही तर या जवानांसाठी कामाच्या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत उपराज्यपाल काय म्हणाले?
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बोलताना उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, याबाबत प्रशासकीय सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत. ते लवकरच या प्रकरणांमध्ये लक्ष घालतील. तसेच योग्य ती पावले उचलतील. लेफ्टनंट गव्हर्नर सचिवालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष कक्षही तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने उपराज्यपालांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने काश्मीरी हिंदूंना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर काश्मिरमध्ये काम करणाऱ्या अल्पसंख्याकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: