Gyanvapi Masjid Case: वाराणसी जिल्हा कोर्टाने कथित शिवलिंगची 'कार्बन डेटिंग' करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. वाराणसीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या आवारात (Gyanvapi Masjid Case) शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवलिंगाची कार्बन डेटिंग (Carbon Dating) करण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. कोर्टाचा हा निर्णय याचिकाकर्त्यांसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. 


वाराणसी कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले की, सुप्रीम कोर्टाने  कथित शिवलिंग सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कार्बन डेटिंग दरम्यान कथित शिवलिंगाला काही नुकसान झाल्यास सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसू शकतो, असेही वाराणसी कोर्टाने म्हटले. 


याआधी वाराणसी हायकोर्टाने Places Of Workship Act 1991 कडे दुर्लक्ष करत ज्ञानव्यापी प्रकरण सुनावणी योग्य मानले होते. त्यानंतर या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान, हिंदू पक्षकारातील चार महिलांनी याचिका दाखल करत कार्बन डेटिंग करण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. श्रृंगार गौरी पूजेस मंजुरी देण्याच्या मागणीवर दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे.


प्रकरण काय?


ऑगस्ट 2021 मध्ये पाच महिलांनी श्रृंगार गौरी पूजेसाठी आणि अन्य धार्मिक बाबींसाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर दिवाणी कोर्टाचे न्या. रवी कुमार दिवाकर यांनी कोर्ट कमिश्नर नियुक्त करून ज्ञानव्यापी मशिदीचे  सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हिंदू पक्षकारांनी दावा केली की, या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळून आले. तर, मुस्लिम पक्षकारांनी सांगितले की हा फवारा आहे. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी हा भाग सील करण्याची मागणी केली होती. कोर्टाने हा भाग सील करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात मु्स्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 


कार्बन डेटिंग म्हणजे काय?


एखादी वस्तू किती जुनी आहे, त्याचा कालावधी निश्चित करण्यात येणाऱ्या वैज्ञानिक चाचणीला कार्बन डेटिंग म्हणतात. यामध्ये 20 हजार वर्ष जुन्या वस्तूंच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. कार्बन डेटिंग चाचणीचा शोध 1949 मध्ये लागला होता. 


कार्बन डेटिंगमुळे ज्ञानव्यापी मशिदीच्या आवारात आढळलेले शिवलिंग कोणत्या कालावधीतील आहे, याचा अंदाज वर्तवता येऊ शकते. 


इतर महत्त्वाची बातमी: