Gyanvapi Mosque ASI Survey : वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानव्यापी मशिद (Gyanvapi Masjid) परिसरात पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु असून या सर्व्हेच्या मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाकडून ज्ञानव्यापी मशिद, परिसर आणि तळघराचं सर्व्हेक्षण सुरु आहे. आता वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसरात ASI सर्वेक्षणाचे मीडिया कव्हरेज थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिम पक्षाने अर्जाद्वारे जिल्हा न्यायालयाकडे दाद मागितली होती.
ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी
आज 10 ऑगस्ट रोजी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा सातवा दिवस आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर भारतीय पुरातत्व विभाग सर्वेक्षण (ASI) करत आहे. ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणाचे वार्तांकन न करण्याचे आदेशही न्यायालयाने माध्यमांना दिले आहेत. सर्वेक्षण पथकातील सदस्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये करू नयेत, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितलं की, शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेत ज्ञानवापी प्रकरणाचा अहवाल सोशल मीडियावर पोस्ट करू नये, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे.
ज्ञानवापीच्या तळघरात हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा
आज रविवारी (6 ऑगस्ट, 2023) ज्ञानवापी मशिद परिसर सर्वेक्षण सुरु आहे. ज्ञानवापीबाबत हिंदू पक्षाच्या वकिलांनी दावा केला आहे की, तळघरात मूर्तींचे अवशेष आणि तुटलेले खांब सापडले आहेत. एएसआयला असे अनेक पुरावे मिळतील, ज्याच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीवरून ज्ञानवापीचे धार्मिक स्वरूप बदलल्याचं स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. तळघरात खंडीत मूर्ती, त्रिशूळ आणि भिंतींवर कमळाच्या कलाकृती सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने दावा केला आहे. दरम्यान याबाबत पुरातत्व विभागाने कोणतीही अधिकृती माहित दिलेली नाही.
ज्ञानवापीच्या इमारतीचं थ्रीडी मॅपिंग
संपूर्ण ज्ञानवापी इमारत एकाच वेळी पाहण्यासाठी सॅटेलाईटद्वारे थ्रीडी मॅपिंग केलं जात आहे. रविवारी झालेल्या सर्वेक्षणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे (ASI) 58 कर्मचारी, हिंदू पक्षाचे 8 जण आणि मुस्लिम पक्षाचे 3 जण उपस्थित होते. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) 2 सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करावा लागेल. ज्ञानवापीचे तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. एएसआयने व्यास तळघरातील भिंतींचे थ्रीडी फोटोग्राफी, स्कॅनिंग केलं. सर्वेक्षणादरम्यान फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यात येत आहे.
संबंधित इतर बातम्या :