Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी 3 ऑगस्टला न्यायालय निकाल देणार आहे. हायकोर्टाने तोपर्यंत सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. आता अंतरिम आदेश 3 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी निर्णय 3 ऑगस्टपर्यंत राखून ठेवल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत स्थगिती कायम राहणार असून इमारतीचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे एएसआयने सांगितले आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाची गरज का पडली?
- वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरातच ज्ञानवापी मशीद स्थापित आहे.
- 17 व्या शतकात मुघल शासक औरंगजेबानं बांधलेली ही मशीद मूळ मंदिराच्या जागेवर असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून केला जातोय
- मशीदीचा परिसर बंदिस्त, नियंत्रित असल्यानं आतल्या गौरीशंकर मंदिरात पूजेस मनाई आहे
- पण ही पूजेची परवानगी मिळावी यासाठी चार हिंदू महिला कोर्टात आल्या आणि तिथून ही न्यायालयीन लढाई सुरु झाली
- यायाधी मशिदीतला वजुखाना म्हणजे शिवलिंगच असल्याचा दावा करत त्याच्या वैज्ञानिक तपासणीची मागणी झाली होती. पण स्थानिक कोर्टानं परवानगी दिल्यानंतर सु्प्रीम कोर्टानं ती थांबवली होती.
- आता शिवलिंग वगळता इतर ठिकाणासाठी ही नव्या सर्वेक्षणाची परवानगी जिल्हा न्यायालयानं दिली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानं हा नवा आदेश दिलाय.
Gyanvapi Masjid Case : काय आहे प्रकरण?
ऑगस्ट 2021 मध्ये पाच महिलांनी श्रृंगार गौरी पूजेसाठी आणि अन्य धार्मिक बाबींसाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर दिवाणी कोर्टाचे न्या. रवी कुमार दिवाकर यांनी कोर्ट कमिश्नर नियुक्त करून ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हिंदू पक्षकारांनी दावा केली की, या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळून आले. तर, मुस्लिम पक्षकारांनी सांगितले की हा फवारा आहे. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी हा भाग सील करण्याची मागणी केली होती. कोर्टाने हा भाग सील करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
ही बातमी वाचा: