Gurugram Viral Video: सोनं चोरणारे, पैसे लुटणारे चोर आपण सगळ्यांनीच पाहिलेत..पण कधी झाडं चोरणारे चोरटे पाहिलेत का? नाही ना... मग सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका व्हिडीओची मोठी चर्चा आहे. त्याचं कारणही तसंच आहे. महागड्या गाड्यांमध्ये फिरणारा, व्हीव्हीआयपी नंबरसाठी लाखोने पैसे खर्च करणाऱ्या व्यत्तीने चक्क रस्त्यांवर ठेवलेली झाडं चोरुन घरी घेऊन गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. दिल्लीजवळच्या (Delhi News) गुरुग्राममधील शंकर चौकात हा सर्व प्रकार घडला आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर उच्चभ्रू वस्तीतील लोकांना हे शोभतं का? अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. दिल्लीजवळच्या गुरुग्राममधील चोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही दोघंही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. 


सजावटीसाठी ठेवलेली झाडं चोरली


दिल्लीजवळच्या गुरुग्राममधील शंकर चौकात जी 20 परिषदेसाठी (G-20 Conference)  शहराची सजावट म्हणून झाडं येथे ठेवण्यात आली. G-20 परिषदेच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी एअरपोर्ट ते हॉटेल लीलापर्यंत सुशोभीकरण करण्यात आले आहे. गुरुग्राम महानगर विकास प्राधिकरणचे जॉईंट CEO एसके चहल म्हणाले की, "G-20 कार्यक्रमासाठी लावलेल्या फुलांच्या कुंड्या चोरणाऱ्या दोन व्यक्तींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे. या दोघांविरोधात DLF फेज 3 पोलीस स्थानकात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. फक्त दिल्लीच नाही उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे.  






नेटकऱ्यांचे संतप्त सवाल


घरी बायकोला खूश करण्यासाठी म्हणून त्यांनी ही झाडं चोरली असतील, 40 लाखाच्या गाडीत फिरायचं आणि 400 रुपयांची झाडं चोरणं शोभतं का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्हायरल व्हिडीओवर देण्यात आल्या आहेत. आता झाडं पाहून घरी बायको जरी खूश झाली असली तरी ट्रोलर्स मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. तुमच्या या वागण्याने फक्त तुमचीच नाही तर तुमच्या शहराची, राज्याची आणि देशाचीही मान शरमेने खाली जात आहे. त्यामुळे रिच मॅन बनण्यासोबतच जबाबदार नागरिकही बनणे गरजेचं आहे, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


G-20 निमित्ताने रस्त्यावर लावण्यात आलेल्या कुंड्यांना कार धडकली, महानगरपालिकेची पोलिसात धाव