WhatsApp Account Ban: मेटाच्या ग्लोबल इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म  व्हॉट्सअॅपने (Whatsapp) जानेवारी महिन्यात तब्बल 29 लाख अकाउंट बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 10.38 लाख अकाउंट सक्रिय नसल्याने ती बंद करण्याचा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे. कंपनीच्या जानेवारी महिन्याच्या मासिक अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. 


व्हॉट्सअॅपने या संबंधी एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, व्हॉट्सअॅप हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवांपैकी गैरवापर रोखण्यासाठी अग्रेसर प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. माहिती तंत्रज्ञान नियम 2021 नुसार, आम्ही आमचा जानेवारी 2023 महिन्याचा अहवाल प्रकाशित केला आहे. या वापरकर्ता-सुरक्षा अहवालात प्राप्त झालेल्या वापरकर्त्याच्या तक्रारी आणि व्हॉट्सअॅपद्वारे करण्यात आलेल्या संबंधित कारवाईचा तपशील तसेच व्हॉट्सअॅपच्या स्वतःच्या प्रतिबंधात्मक कृतींचा समावेश आहे. आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून त्याचाच भाग म्हणून व्हाट्सएपने जानेवारी महिन्यात 29 लाख अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


यापूर्वी, डिसेंबर 2022 मध्ये, या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने देशातील 36 लाखांहून अधिक अकाउंट्सवर बंदी घातली होती. जानेवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपला भारतातून 1,461 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि 195 अहवालांवर कारवाई करण्यात आली आहे. 1,461 तक्रार अहवालांपैकी, 1,337 तक्रारी या बंदी घालण्यासाठी होत्या, तर इतर तक्रारी या सुरक्षेसंबंधित होत्या. 


यूजर्सकडून आलेल्या तक्रारींची दखल घेणे आणि त्यावर कारवाई करणे, तसेच या प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. डिसेंबर महिन्यासाठी, व्हॉट्सअॅपकडे भारतातून 1,607 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानंतर 166 अहवालांवर कारवाई करण्यात आली होती.


ही बातमी वाचा: