अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाकडून स्वतःच्या विजयाचा आत्तापासूनच दावा करण्यात येत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कोण झेंडा फडकवणार, निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा काय असेल, अशा अनेक विषयांबाबत एबीपी न्यूज-लोकनिती-सीएसडीएसने ओपिनियन पोल घेतला आहे. एबीपी न्यूज-लोकनिती-सीएसडीएसच्या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा झेंडा फडकवणार आहे. गुजरातच्या चारही भागांमध्ये भाजपच पुढे आहे. तर काँग्रेसची अवस्था गेल्या निवडणुकीपेक्षाही वाईट असल्याचं या पोलमधून दिसून आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून कोण हवं?
  • विजय रुपाणी- 24 टक्के
  • नरेंद्र मोदी - 7 टक्के
  • आनंदीबेन पटेल-  5 टक्के
  • भरत सिंह सोलंकी - 2 टक्के
कोणत्या पक्षाला किती जागा?
  • भाजप- 144-152
  • काँग्रेस- 26-32
  • इतर- 3-7
गुजरातच्या पूरस्थितीत सरकारचं काम कसं होतं?
  • चांगलं - 57 टक्के
  • खराब- 20 टक्के
  • माहित नाही - 23 टक्के
निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा काय?
  • महागाई - 13 टक्के
  • बेरोजगारी- 10 टक्के
  • गरीबी- 9 टक्के
  • विकास- 7 टक्के
नोटाबंदीबाबत मत काय?
  • चांगला निर्णय - 55 टक्के
  • ठिक निर्णय - 22 टक्के
  • वाईट निर्णय - 19 टक्के
  • माहित नाही - 4 टक्के
भाजप सरकारचं कामकाज कसं आहे?
  • पूर्ण समाधानी - 37 टक्के
  • समाधानी- 32 टक्के
  • असमाधानी -14 टक्के
  • पूर्ण असमाधानी - 13 टक्के
  • प्रतिक्रिया नाही - 4 टक्के
जीएसटीबाबत मत काय?
  • चांगला निर्णय - 38 टक्के
  • ठिक निर्णय - 22 टक्के
  • वाईट निर्णय - 25 टक्के
  • माहित नाही - 15 टक्के
शंकरसिंह वाघेला यांनी काय करावं?
  • नवीन पक्षाची स्थापना करावी - 5 टक्के
  • भाजपसोबत जावं - 16 टक्के
  • काँग्रेसमध्ये परतावं - 11 टक्के
  • राजकारण सोडावं - 24 टक्के
  • प्रतिक्रिया नाही - 45 टक्के
कच्छ-सौराष्ट्रात कुणाला किती मतं?
  • एकूण जागा - 54
  • भाजप - 65 टक्के
  • काँग्रेस- 26 टक्के
  • इतर- 9 टक्के
उत्तर गुजरातमध्ये कुणाला किती मतं?
  • एकूण जागा - 53
  • भाजप - 59 टक्के
  • काँग्रेस- 33 टक्के
  • इतर- 8 टक्के
दक्षिण गुजरातमध्ये कुणाला किती मतं?
  • एकूण जागा - 35
  • भाजप - 54 टक्के
  • काँग्रेस- 27 टक्के
  • इतर- 19 टक्के
सर्व्हे कसा करण्यात आला? हे सर्वेक्षण 9 ऑगस्ट 2017 ते 16 ऑगस्ट 2017 या काळात करण्यात आलं. 50 विधानसभा मतदारसंघात 4090 लोकांचं मत जाणून घेण्यात आलं.