Gujarat News : गुजरातच्या मोरबी (Morbi) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळून (Medical College Slab Collapsed) भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी (Morbi Accident) झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. प्रशासनाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. कोसळलेल्या स्लॅब खाली काही जण अडकल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली होती. त्यानंतर शोध कार्य राबवत जखमींना बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.  


मोरबी येथे मोठी दुर्घटना


गुजरातच्या मोरबीमध्ये पुन्हा एकदा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मोरबी येथे नव्याने बांधलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, त्यामुळे अनेक जण जखमी झाले. अपघातानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी कोण बचाव मोहीम राबवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी बांधकाम सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा एक भाग कोसळला, ज्यामध्ये किमान चार कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.


निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला


एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असलेल्या मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, या दुघटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक भाजप आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, स्लॅब कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेसंबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.


पाहा घटनास्थळावरील व्हिडीओ 






मोरबी पूल दुर्घटनेत 130 जणांचा मृत्यू


गुजरातमधील मोरबी शहर पूल दुर्घटनेमुळे चर्चेत आलं होतं. 2022 मोरबी पूल दुर्घटना 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवर बांधलेला पूल कोसळला होता, ज्यामुळे आतापर्यंत 130 लोकांचा मृत्यू झाला. हा पूल काही दिवस आधीच सुरु करण्यात आला होता. दिवाळी आणि गुजरातील नववर्षाच्या निमित्ताने पुलावर मोठी गर्दी झाली, ज्यामुळे पूल कोसळून दुर्घटना घडली. यावेळी पुलावर सुमारे 500 जण होते आणि पुलाची क्षमता फक्त 150 लोकांची होती. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर थरकाप उडाला होता.