गांधीनगर: गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान होत आहे. आज गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. गुजरातमधील जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.


मतदान संपल्यानंतर एबीपी माझाच्या वेबसाईटवर आज संध्याकाळी गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर होईल.

सर्वात विश्वासू आणि अचूक अंदाज म्हणून एबीपी-सीएसडीएसने यापूर्वीही अनेक निवडणुकीत एक्झिट पोलद्वारे भाकीतं वर्तवली होती.

दरम्यान, गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे निकाल  18 डिसेंबरला जाहीर होणार आहेत, ते निकाल तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल.

एक्झिट पोल कुठे पाहू शकाल?

गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे एक्झिट पोल तुम्ही एबीपीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. टीव्हीसह मोबाईलवर तुम्हाला एक्झिट पोल पाहता येईल.

तुम्ही ABP LIVE हे अप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला प्रत्येक बातमीचे नोटिफिकेशन तर मिळेलच, शिवाय तुम्हाला लाईव्ह टीव्हीही पाहता येईल.

#ABPExitPoll या हॅशटॅगसह तुम्ही ट्विटरवर ट्विट करु शकता.
*लाईव्ह टीव्ही - http://abpmajha.abplive.in/live-tv

*फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

* यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhalive

पहिला टप्पा

दरम्यान, गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यतील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं.

गुजरात निवडणूक : एकूण जागा 182

पहिला टप्पा: 89 जागा: मतदानाची टक्केवारी 68 % : सौराष्ट्र- कच्छ, राजकोट, जामनगर

दुसरा टप्पा : 93 जागा: मतदानाची टक्केवारी  --  : दक्षिण, मध्य आणि उत्तर

पाटन, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, खेडा, महिसागर, पंचमहल, दाहोद, आणंद, बडोदा आणि उदेपूर

कोणत्या विभागात कुणाची बाजी?

गुजरातमध्ये कोणत्या विभागात कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा- 54)

उत्तर गुजरात (एकूण जागा - 53)

दक्षिण गुजरात (एकूण जागा - 35)

मध्य गुजरात (एकूण जागा - 40)

गुजरातचा 2012 मधील निकाल

भाजप – 115

काँग्रेस – 61