गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान पार पडलं. एकूण 68.70 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य आणि उत्तर गुजरातमधील उमेदावारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि हार्दिक पटेलसह अनेक दिग्गजांनी मतदान केलं.

9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं होतं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताची टक्केवारी घसरल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं. 18 डिसेंबरला गुजरातचा निकाल लागणार आहे. दरम्यान त्यापूर्वीच समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे.

लाईव्ह अपडेट :

- दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपली, 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान संपन्न

- गुजरातमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 47.40 टक्के मतदान  

- गुजरातमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान  

- मतदान केंद्राबाहेरील पंतप्रधान मोदींच्या रोड शोवर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

- पंतप्रधान मोदी मतदानासाठी सामान्यांप्रमाणे रांगेत



- थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमतीतील राणिप येथे मतदान करणार 

- मतदान करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. 'भाजपचा पराभव अटळ आहे. त्यामुळे जनतेनं आपलं मत अहंकाऱ्यांविरोधात देणं गरजेचं आहे. जनतेची ताकद काय आहे ते त्यांना दाखवून द्या.' असं हार्दिक पटेल त्यावेळी म्हणाले.

- भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या नारंगपुरा येथे मतदान केलं. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवादही साधला. 'मोठ्या उत्साहात मतदान सुरु आहे. मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा. देशात आणि जगात गुजरातच्या विकास मॉडेलची चर्चा आहे. गुजरातचा हाच चढता आलेख कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा.' असं आवाहन यावेळी अमित शाह यांनी केलं.

- माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी देखील मतदान केलं.

LIVE : गुजरातचा रणसंग्राम : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांनीही बजावला मतदानाचा हक्क 



- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला

- 'निवडणुकीनंतर आमच्या मुलावर कारवाई केली जाईल अशी भीती वाटते', हार्दिक पटेलच्या आई-वडिलांची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया 

निवडणूक आयोगाने मतदानासाठी जय्यत तयारीही केली आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ८९ जागांसाठी ९ डिसेंबरला मतदान पार पडलं. यावेळी  सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज होणाऱ्या मतदानासांठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचं आवाहन काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आलं आहे.

यंदाची ही निवडणूक पक्षकेंद्रीत न होता चेहरा केंद्रीत झालेली पाहायला मिळते आहे. एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भाजपसाठी सगळा जोर लावला आहे. तर काँग्रेसच्या विजयासाठी राहुल गांधींनीही यंदा जोरदार प्रयत्न केले आहेत.

दुसरीकडे पाटीदार नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचाही प्रभाव यंदाच्या निवडणुकीवर दिसतो आहे. या सगळ्याचा आजच्या मतदानावर काय परिणाम होईल, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींच्या मुलाखतीने आचारसंहिता भंग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

गुजरातमध्ये भाजपला धक्का, आकडेवारीच्या आधारे योगेंद्र यादवांचा अंदाज

‘गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल’, राहुल गांधींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

मोदी रोज चार लाखांचे मशरुम खाल्ल्यामुळे गोरे : अल्पेश ठाकोर

गुजरातमध्ये आश्चर्यकारक निकाल दिसेल: राहुल गांधी

पोलिसांनी परवानगी नाकारुनही हार्दिक पटेलचा अहमदाबादेत भव्य रोड शो