Gujarat Accident News: गुजरातच्या नवसारीमध्ये (Gujarat Navsari Accident) कार आणि बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू (Nine Died) झाला असून  28 जण जखमी आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच  पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य  सुरू केले. 


नवसारी जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 11 जणांना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर 17 जणांनर  वलसाड (Valsad) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला सूरतच्य  (Surat)  सिव्हिल रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  अपघात झाल्यानंतर बसचालकला मोठा धक्का बसला. बसचालकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 


प्राथमिक माहितीनुसार बस अहमदाबाद शताब्दी महोत्सवासाठी प्रवाशांना वलसाड येथे जात होती. दरम्यान रेश्मा गावाजळ एका फॉर्च्युनर कार आणि बसची धडक झाली. या अपघातानंतर रोडवर वाहनांच्या लांबच लांब लागल्या होत्या. एक क्रेनच्या साहाय्याने बसला बाजूला घेण्यात आले. पोलिस तपास करत असून जे प्रवासी किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. तर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, बस अपघातात  25 विद्यार्थी किरकोळ जखमी


बारामती- सहलीसाठी गेलेल्या औरंगाबाद आणि शिर्डीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. बस अपघातात 25 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. इचलकरंजीतल्या सागर क्लासची सहल निघाली होती.  शैक्षणिक सहल शिर्डी येथून इचलकरंजीकडे जाताना यशोदा ट्रॅव्हल्सची बस बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत आली बसला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  अपघातात  24 विद्यार्थिनी किरकोळ आणी चार विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत. एकूण 48 मुली आणि 5 शिक्षक होते. जखमींवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.