अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. 1 जुलैपासून देशात नवी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.
शिवाय सर्व खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेही कार्यक्रमासाठी उपस्थित असतील.
जीएसटीचा विकासदरावर चांगला परिणाम होईल. जम्मू आणि काश्मीरासाठी प्रक्रिया सुरु आहे. सगळे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले आहेत, अशी माहिती अरुण जेटलींनी दिली.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा कायदा लागू करण्यासाठी मध्यरात्री संसदेचं विशेष सत्र बोलावण्यात येणार आहे. 1 जुलैला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जीएसटी लागू होण्याशिवाय इतर घोषणाही केल्या जाऊ शकतात.
काय आहे जीएसटी?
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.
या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.
संबंधित बातम्या :