​​​​Indian Navy Recruitment 2022​: देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात ​(Indian Navy) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. या प्रक्रियेत अंतर्गत 50 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार येत्या 27 जानेवारीपासून भारतीय नौदलाच्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर लवकरात लवकर अर्ज करावा. कारण, ऐनवेळी वेबसाईटवर अधिक भार आल्यानं उमेदवारांना अर्ज करण्यास समस्या येऊ शकते.

 

भारतीय नौदल चार वर्षांचा B.Tech पदवी अभ्यासक्रम 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना आणि IT SSC अधिकारी पदांसाठी पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवली जात आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट (joinindiannavy.gov.in) वर जाऊन अर्ज करू शकतात. 27 जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीअंतर्गत भारतीय नौदलातील एकूण 50 पदे भरण्यात येणार आहेत. याशिवाय, उमेदवार या पदांसाठी https://www.joinindiannavy.gov.in या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. 8 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

 

पात्रता-

भारतीय नौदलाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार दहावी आणि बारावी उतीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला इंग्रजी विषयात 60 टक्के गुण असणे गरजेचे आहे. याचबरोबर उमेदवारांने कम्प्युटर सायन्समध्ये बीई/बी.टेक/एम.टेक/सीएसई/आईटी/सॉफ्टवेयर सिस्टम/सायबर सिक्योरिटी/सिस्टम एडमिन अॅण्ड नेटवर्किंग/कंप्यूटर सिस्टम्स एंड नेटवर्किंग/डेट एनालिटिक्स/आर्टिफिशियल इंटेलिजेन्स किंवा एमसीए असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट-

या पदासाठी उमेदवारांचा जन्म  02/07/1997 ते 01/01/2003  दरम्यान झालेला असावा. 

 

हे देखील वाचा- 


 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha