सध्या 30 हजार रुपये प्रतितोळा मिळणारं सोनं आता प्रतितोळा थेट 34 हजारांवर पोहोचलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात सोन्याचा दर 38 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात ही घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील लढतीत ट्रम्प आघाडीवर आहेत.
लोकांच्या घबराटीमुळे सोन्याचा भाव वाढ वाढल्याचा दावा, तज्ज्ञांनी केला आहे. तर शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील.
सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प
देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांचे व्यवहार बंद असणार आहे. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.