नवी दिल्ली : मोदी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सर्वसामान्यांना व्यवहारात मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोल नाका, एटीएम आणि पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
या निर्णयामुळे टोल नाक्यांवर पेच निर्माण झाला आहे. टोल कर्मचारी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा घेण्यास तयार नसल्याचं चित्र अनेक टोलनाक्यांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद सुरु होत आहेत. परिणामी अनेक टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. टोलनाक्यावर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेत नसल्याने प्रवास करणाऱ्यांनी करायचं काय, असा प्रश्न वाहनचालक करत आहेत.
दुसरीकडे, 500 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा पंतप्रधानांनी केल्यानंतर पैसे काढण्यासाठी देशभरातील एटीएम बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.
याशिवाय मुंबईत एटीएमप्रमाणेच पेट्रोल पंपावरही लोकांची झुंबड उडाली. पेट्रोल पंपावर 500 किंवा 1000 रुपयांच्या नोटा देऊन इंधन खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या.
संबंधित बातम्या