पणजी : ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी कोव्हिडचे नियम पाळले पाहिजे, नाईट कर्फ्यू लावायला भाग पाडू नये असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. गोवा राज्यात ख्रिसमस आणि नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यत गोव्यात मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केलं जातं. मात्र पर्यटक किंवा गोव्यातील नागरिकांनी सेलिब्रेशन करताना कोव्हिडचे नियम पालन करणे गरजेचं आहे असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


गोव्यात आतापर्यंत 28 व्यक्तींची ओमायक्रॉन संदर्भात तपासणी केली. यातील 8 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र यातील काही व्यक्ती डेल्टा व्हेरियंट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोव्यात पर्यटन विभागाकडून सोमवारी नियमावली जारी करण्यात येणार आहे. 


गोव्यात सेलिब्रेशनवर कुठेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मात्र गोव्यातील सेलिब्रेशन कोव्हिडच्या प्रोटोकॉलनुसार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील महिन्याभरात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसण्यात येईल. जेणेकरून परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची चाचणी लवकर करण्यात येईल. सध्या या चाचण्या पुण्यात केल्या जातात. त्यामुळे अहवालासाठी 20 ते 25 दिवस वाट पहावी लागते.


गोव्यात कोव्हिड पोझिटिव्हिटी दर वाढत आहे. त्यामुळे गोव्यातील नागरिक आणि येणाऱ्या पर्यटकांनी कोव्हिड संदर्भात नियमावली पाळली पाहिजे असं राज्य सरकारने सांगितलं आहे. जर सगळ्यांनी नियम पाळले तर पॉझिटिव्ही दर आटोक्यात आणता येईल. मात्र सध्यातरी गोव्यात नाईट कर्फ्यू लावण्यात येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.  नागरिकांनी सरकारला नाईट कर्फ्यू लावायला भाग पाडू नये, जे नागरिक मास्क लावणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं राज्य सरकारने सांगितलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :