पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लवकर बरे व्हावेत यासाठी गोव्यात सर्वधर्मीय लोक प्रार्थना करु लागले आहेत. अनेक जण गणरायाला साकडे घालत असताना काल (20 सप्टेंबर) मडगावमध्ये मुस्लीम बांधवांनी कुराण पठाण करुन पर्रिकर यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री पर्रिकर हे आजारी असल्याने राज्यातील अनेक लोक त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी देवाला साकडं घालत आहेत. पर्रिकर यांच्यासाठी सर्व धर्मांतील लोक प्रार्थना करताना दिसत आहेत. काल दक्षिण गोवा भाजप कार्यालयात काही मुस्लीम बांधवांनी पर्रिकर यांचं आरोग्य सुधारावे, यासाठी प्रार्थना केली. यावेळी गोवा राज्य हज समितीचे अध्यक्ष शेख जिना, युसूफ शेख आणि इतर उपस्थित होते.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे दिल्लीत उपचारासाठी गेल्याने ते लवकर बरे होऊन पुन्हा सुरळीत सरकार चालवावे, यासाठी सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पार्से सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीकडे साकडं घातलं. यावेळी पार्से सरपंच प्रगती सोपटे, पंच अरुण पार्सेकर, संदीप राणे, नीलेश कलंगुटकर, शेखर पार्सेकर, जयदेव बगळी, सिद्धेश नाईक, माजी जिल्हा सदस्य दीपक कलंगुटकर आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या
गोव्यातील राजकीय समीकरणं काय? काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा कशामुळे?
गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही- भाजप प्रदेशाध्यक्ष