Goa Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येतील तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांसह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न होता, पण गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूका लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे. 


पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी गोव्यात काँग्रेससोबत युती न झाल्याची माहितीही दिली, पुढील दोन दिवसांत उमेदरांची यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रफुल पटेल म्हणाले की, 'महाराष्ट्राप्रमाणे काँग्रेसला गोव्यातही युती करण्याची आम्ही ऑफर दिली होती. याबाबत चर्चाही झाली. पण यामधून काहीही साध्य झाले नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणूका लढवतील. सर्व ४० जागांवर आम्ही निवडणूका लढवणार नाही, पण महत्वाच्या जागांवर आम्ही उमदेवार उभे करणार आहोत. उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर काही दिवसानंतर दुसरी यादीही जाहीर करण्यात येईल.' 
 






राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची होती मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युती हवी होती मात्र काँग्रेसच्या हट्टापायी हा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. 


आमच्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत- प्रफुल्ल पटेल
महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे काँग्रेस पक्षात सहभागी असल्यामुळे  काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, मात्र गोव्यात काँग्रेस ने अडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागत आहे, आमची लढाई ही लोकशाही पद्धतीने असणार आहे आम्ही गोव्यात कोणता पक्ष आमच्या समोर आहे हे पाहणार नाही


अपक्ष लढल्यास उत्पल परिकरांना आमचा पाठिंबा - काँग्रेस
पणजी मतदारसंघातून उत्पल परिकरांनी अपक्ष निवडणूक वाढविल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहेत, मात्र भाजपने मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल परिकर यांना तिकीट नाकारल्यास हा मनोहर परिकर यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी सांगितले.


दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि  ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही यावेळी आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे गोव्यात कोणाचं  सरकार येणार? हे 10 मार्च रोजी समजणार आहे. गोव्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. गोवा विधानसभेत भाजपचे 25 आमदार असून नुकतेच आमदार कार्लोस अल्मेडिया आणि एलिना सलडाना यांनी राजीनामा दिला आहे.


महत्वाच्या बातम्या