Goa Election 2022 Date: गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होईल तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. 


गोव्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. गोवा विधानसभेत भाजपचे 25 आमदार असून नुकतेच आमदार कार्लोस अल्मेडिया आणि एलिना सलडाना यांनी राजीनामा दिला आहे.


गोवा फॉरवर्ड -काँग्रेस आघाडी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीनं (GFP) काँग्रेसशी (Congress) आघाडी केलीय. यापूर्वी जीएफपीनं भाजपसोबत सत्तेत भागीदारी केली होती. मात्र, 2019 जुलै महिन्यात जीएफपी पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह तीन आमदारांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षानं भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी सरदेसाई प्रमोद सावंतच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. दरम्यान, या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि  ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे गोव्यात कोणाचं  सरकार येणार? हे 10 मार्च रोजी समजणार आहे.  


2011 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार गोवा हे हिंदू बहुसंख्य राज्य आहे. गोव्यात 66.08 टक्के हिंदूंची लोखसंख्या असून गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य लोक हिंदू आहेत. 15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात 8.33 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. गोव्यात हिंदूंनंतर ख्रिश्चन समाजाची संख्या सर्वाधिक आहे. गोव्यात 25.10 टक्के ख्रिश्चन समाजाची संख्या आहे. 


अनुसूचित जमातीचे फक्त 0.04 टक्के लोक गोव्यात राहतात. तर 0.10 टक्के शीख आणि 0.08 टक्के बौद्ध व जैन समुदाय आहे. दरम्यान परदेशातून आलेले आणि भारतातील परंतु, गोवा सोडून इतर राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त लोक गोव्यात राहतात.  


महत्वाच्या बातम्या