पणजी : गोव्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या राज्यात आता 29 एप्रिल ते 3 मे असा पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. गुरुवारी सध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 3 मेच्या सकाळी 6 वाजेपर्यंत गोव्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहिल.


 






काय सुरू, काय बंद? 
गोवा सरकारने लावलेल्या या लॉकडाऊनमुळे राज्यातील कसिनो, हॉटेल्स आणि पब हे बंद राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि उद्योगधंदे सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल, हॉस्पिटल्स, किराणा मालाची दुकाने, दूध, भाजीपाला यांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातून अनेक मालिकांचे शुटिंग गोव्यामध्ये 
जी लोकं गोव्यामध्ये येत आहेत त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय टूरिस्ट स्पॅाट आहे. अनेकांनी लॅाकडाऊनमध्ये गोव्यातून कार्यालयीन काम करायला पसंती दिलीय. तसेच महाराष्ट्रात गेल्या 14 एप्रिलला लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  अनेक मराठी आणि हिंदी मालिकांचे शुटिंग गोव्यामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.  आता या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शुटिंग कसं करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या मालिकांच्या शुटिंगवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत.   


गोव्यात मंगळवारी एकाच दिवसात 2,110 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली, तसेच 31 रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी एकाच दिवसात 748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्य सरकारच्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत गोव्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या जवळपास 82 हजार इतकी पोहोचली आहे तर एकूण मृतांची संख्या ही 1,086 इतकी झाली आहे. गोव्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 64,231 इतकी झाली आहे. 


देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून गेल्या आठवड्यात रोज तीन लाख रुग्णांची भर पडताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा किंवा कडक निर्बंधाचा पर्याय निवडला आहे. देशातील मृतांची संख्याही आता दोन लाखांवर पोहोचली आहे. त्यात आता गोव्याचीही भर पडली आहे. 


पहा व्हिडीओ : Goa Lockdown : गोव्यात 5 दिवसाचा कडक लॉकडाऊन; कर्नाटक पाठोपाठ भाजपशासित दुसरं राज्य लॉकाडाऊन


 



 


महत्वाच्या बातम्या :