Madhya Pradesh : सोशल मीडियावर (Social Media) विविध प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात, ज्यामध्ये कुठे ना कुठे चित्रविचित्र घटना घडत असल्याचं दिसून येतं. काही घटन इतक्या मजेशीर असता, ज्या पाहून लोकांना हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रेवा भागातील हा व्हिडीओ आहे, यामध्ये एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून जात आहे. मुलगी तिच्या प्रियकरासोबत बस स्टॉपवर पोहोचताच तिचा भाऊ तिथे पोहोचतो, यानंतर घटनास्थळी अनेक लोक जमा होतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल (Viral Video) होत आहे.


प्रियकरासोबत पळून जात असताना मुलीला पकडलं


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बस स्टॉपजवळील दृश्य दिसत आहेत. जिथे एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवर बसले आहेत आणि एक मुलगा उभा राहून त्यांच्याशी वाद घालताना दिसत आहे. बाईकवर बसलेले मुलगा आणि मुलगी हे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जातंय. आणि जो मुलगा उभा राहून त्यांच्याशी वाद घालतो तो मुलीचा भाऊ आहे. मुलगी प्रियकरासह घरातून पळून जात आहे, यासाठी मुलगी आणि तिचा प्रियकर बस स्टॉपपर्यंत पोहोचतात. पण तेवढ्यात मुलीचा भाऊ तिथे पोहोचतो आणि दोघांनाही पकडतो. यानंतर तो दोघांवरही हात उचलताना दिसत आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.


पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला


हे प्रेमप्रकरण मध्य प्रदेशातील रेवा भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. भावाने मुलीला पकडल्यानंतर ती प्रियकरासह पोलीस ठाण्यात गेली. जिथे पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र मुलगी प्रियकरासोबत राहण्यावर ठाम होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, ते दोघेही प्रौढ आहेत, त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते एकत्र देखील राहू शकतात. पोलिसांनी समजूत काढून हे प्रकरण तिथेच सोडलं, त्यांनीही प्रेमीयुगुलाच्या बाजूने निर्णय दिला आणि कुटुंबाची समजूत काढली.


हेही वाचा:


Double Dating : तुमच्या मागे तुमच्या पार्टनरचं काय सुरूये, डबल डेट तर करत नाही ना? 'या' टिप्सनं त्याला रंगेहात पकडा


Virar Crime : स्वतःच्या लग्नासाठीच चक्क चोरी; भावी पत्नीला मंगळसूत्र घालण्यासाठी स्कुटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलं