संदीप सहवाग या फेसबुक यूजर्सने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला असून, त्यानं म्हटलंय की, “गुरुग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेण्डच्या घराबाहेर डीजे लावून, डान्स केला. बॉयफ्रेण्डने धोका दिल्याने, तिने ही कृती केली.”
सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. पण याची कुणीही सत्यता पडताळलेली नाही. पण हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून अनेक फेसबुक यूजर्स आपपल्या मित्रांना टॅगही करत आहेत.
जळपास चार हजारपेक्षा जास्त यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला असून, अजून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अद्याप हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही.