Mukhtar Ansari Convicted: गँगस्टर मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांना दोषी ठरवण्यात आले आहे.  वाराणसीच्या  (Varanasi) एमपी-एमएलए (MP-MLA Court)  कोर्टाने 32 वर्षापूर्वीच्या   (MP-MLA Court)  एका खटल्यासंदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी दोषी ठरवले आहे. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी सोमवारी कोर्टानी त्यांना दोषी ठरवले आहे. तर  लंच ब्रेकनंतर अन्सारी यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 


अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने  गँगस्टर मुख्तार अन्सारीला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. अवधेश राय हे काँग्रेस नेते अजय राय यांचे भाऊ होते . कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी अजय राय म्हणाले, 32 वर्षानंतर आज त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळणार याची खात्री आहे. 


कोर्टाला छावणीचे रूप 


आज सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी कोर्टाला छावणीचे रूप आले आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अवधेश राय यांची 3 ऑगस्ट 1991 साली करण्यात आली होती. अवधेश राय आपला छोटा भाऊ काँग्रेस नेते अजय राय यांच्या घराबाहेर उभे होते. अचानक  एक व्हॅन आली. व्हॅनमधील लोक खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. 






काय आहे प्रकरण?


काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर माजी खासदार अजय राय यांनी चेतगंज पोलिस स्थानकात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे. 


हे ही वाचा :