Coromandel Train Accident: ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 288 वर पोहोचलाय. तर हजारहून अधिक प्रवासी जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. संध्याकाळी सातच्या सुमारास हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी ट्रेन धडकली. आणि त्यानंतर मृत्यूचं तांडवच सुरू झालं. अपघातानंतर  आपत्कालीन स्थिती उद्भवली मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या. रिलायन्स फाउंडेशनने (Reliance Foundation) देखील पुढाकार घेतला असून  जेवण, औषधांपासून मनुष्यबळापर्यंतची मदत संस्था करत आहे.


रिलायन्स फाउंडेशनने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करताना रिलायन्स फाउंडेशनने ओडिशातील बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातावर शोक व्यक्त केला आहे.जखमींच्या लवकर बरं होण्याची प्रार्थना  केली आहे. तसेच  आमची टीम घटनास्थळी मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे रिलायन्स फाउंडेशनने म्हटले आहे.






 


रिलायन्स फाउंडेशनने पुढे म्हटले आहे, आप्तकालीन परिस्थितीत आमची टीम जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करते आहे. आमची एक टीम घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांना  जेवण, औषधांपासून मनुष्यबळापर्यंतची सर्व  मदत करत आहे. तर एक टीम बचावकार्यात व्यस्त आहे. 


बालासोरमधील अपघातस्थळी 51 तासांनी धावली ट्रेन


 कोरोमंडल एक्स्प्रेसचा वेग ताशी 128 किमी होती. ही एक्सप्रेस मालगाडीवर आदळली आणि मालगाडीत लोखंड असल्यानं अपघाताची तीव्रता वाढली. याचं कारण म्हणजे कोरोमंड़ल एक्स्प्रेसची धडक बसल्यानं मालगाडी दूर फेकली गेली नाही, ती जागेवरच राहिली. यामुळे ट्रेनला बसलेल्या धडकेची तीव्रता वाढली. दुसरं म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा तिथून शालिमार एक्प्रेस जात होती. कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे शालिमार एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन डब्यांवर आदळले. अगदी काही सेकंदाच्या फरकानं ही दुसरी टक्कर झाली.  बालासोरमधील अपघातस्थळी आता एक मार्ग खुला झाला आहे. यावरून आधी चाचणीसाठी आज पहाटे एक मालगाडी सोडण्यात आली. मग सकाळी आठच्या सुमाराला पॅसेंजर ट्रेनही सोडण्यात आली. गेल्या 51 तासांपासून तब्बल एक हजार मजूर रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.