Dawood Ibrahim : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) कराचीमध्येच असल्याचा दावा भाचा अलिशाहनं केल आहे. सणासुदीला दाऊदची पत्नी कुटुंबीयांशी संपर्क करत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. दाऊदच्या ठिकाणाबाबत हसीन पारकरचा मुलगा असलेल्या अलिशाहनं अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी)  माहिती दिली आहे. दाऊद इब्राहिम प्रकरणी ईडी आणि एनआयएच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. 


दाऊदचे नातेवाईक आणि त्याच्या साथीदारांच्या चौकशीत दाऊद कराचीत असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा पाकिस्तान सरकारने सातत्याने इन्कार केला आहे. मात्र तो कराचीत असल्याचे आता समोर आले आहे. दाऊद इब्राहिम 1986 च्या सुमारास भारत सोडून गेला होता. दाऊद इब्राहिम हा माझा मामा असून तो 1986 पर्यंत दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होता, असे पारकर यांनी आपल्या जबाबत म्हटले आहे. दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याचे मी अनेक सूत्रांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकल्याचे पारकरने सांगितले आहे. कधी कधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने माझे मामा आणि मामा माझ्या पत्नी आणि बहिणींशी संपर्क साधतात असेही त्याने सांगितले आहे.


ईडीकडून हसीना पारकरच्या मुलाची चौकशी करण्यात येत आहे. यावेळी ही माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्यावर कोर्टात दाखल केलेल्या आरोपातील ईडीच्या चार्जशीटमध्ये ही माहिती आहे. त्यामध्ये दाऊद इब्राहिम याची बायको त्याला संपर्क करते असा दावा अलीशाह याने केला आहे. 1986 मध्ये माझा जन्म झाला. त्याआधीच माझा मामा (दाऊद इब्राहिम) देश सोडून निघून गेला. अधूनमधून म्हणजे ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या प्रसंगी दाऊद इब्राहिमची पत्नी आणि माझी मामी मेहजबीन दाऊद इब्राहिम, माझे मामा माझी पत्नी आयेशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात. दाऊद कायमच मुंबईतल्या अंडरवर्ल्डचा केंद्रबिंदू राहिला आहे. गँगवॉर, गुन्हेगारी जगत, हत्या, खंडणी हे सगळं दाऊदच्या मागे होतंच. 1993 ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा दाऊद मास्टरमाईंड आहे असा आरोप त्याच्यावर आहे. मुंबईत झालेल्या स्फोटांमध्ये 250 पेक्षा जास्त लोक ठार झाले होते तर 700 हून जास्त लोक जखमी झाले होते.


महत्वाच्या बातम्या: