Queen Elizabeth-II Funeral: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)  देखील लंडनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील.


राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा दिवस ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हेही राणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही लंडनला जाणार असल्याची माहिती आहे.


वयाच्या 96 व्या वर्षी झालं निधन


राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं 96 व्या वर्षी बालमोरल कॅसल येथे गुरुवारी निधन झाले. त्या 70 वर्षे ब्रिटनवर राज्य करत होत्या. एडिनबर्ग विमानतळावरून राणीची शवपेटी लंडनसाठी पाठवण्यात आली, तेव्हा तिथे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी रॉयल एअरफोर्सच्या विमानानं त्यांचं पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आलं. क्वीन एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जनसमुदाय लोटला आहे.  महाराणीचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) ठेवण्यात आलं आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव 19 सप्टेंबर रोजी विंडसर, लंडन येथील किंग जॉर्ज IV मेमोरियल चॅपल येथे दफन केलं जाईल.


दरम्यान, एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा आणि सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या. त्यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


भाजप प्रत्येक राज्यात आमदार खरेदी करत आहे, हा पैसा कुठून येतोय; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल
LPG Subsidy : केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट'? एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता