Pune Crime News:  पुण्यात (Pune) लज्जास्पद घटना घडली आहे. एका महिलेला कंडोमचं (Condom) पाकिट दाखवून अश्लील वर्तन करणाऱ्या दोघांवर लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले दोघेही नामांकित व्यावसायिक असून पितापुत्र आहेत. त्यांच्या या वर्तनामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. 59 वर्षीय दिलीप रिकबचंद ओसवाल आणि 29 वर्षीय त्याचा मुलगा आकाश दिलीप ओसवाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पितापुत्राची नावं आहेत. दोघेही गॉड्स गिफ्ट सोसायटी, मंगलदास रोड, बंडगार्डन या परिसरातील रहिवासी आहेत.


महिलेला कंडोमचे पाकिट दाखवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केलं. त्यानंतर महिला आम्हाला खूश करण्यासाठीच असतात, अशी भाषा वापरली. पितापुत्राच्या या जोडीने अशाप्रकारचं लज्जास्पद वर्तन केल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी महिलेकडून माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी पितापुत्रावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार महावीर रिअॅल्टी (Mahaveer Realty) या कंपनीमधील वाघोली येथील सिल्वर क्रीस्ट या प्रोजेक्ट येथे तसेच बंडगार्डन येथील कार्यालयात 5 एप्रिल ते 20 जुलै 2022 दरम्यान घडला होता. 


दिलीप ओसवाल आणि आकाश ओसवाल या दोघांनी काही महिने महिलेचा छळ केला. त्या महिलेला शिवीगाळ केली. दिलीप ओसवाल यांमी महिलेल्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला शिवाय शरीर दाबण्याचा प्रयत्न केला. ऑफिसजवळ पडलेलं कंडोमचं पाकिट हातात घेऊन महिलेच्या तोंडासमोर करत होते. महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होते. त्यानंतर मुलगा आकाशही वडिलांचं पाहून तसंच कृत्य करत होता. त्याने महिलेल्या शरीरावर हात फिरवत कंडोमचं पाकिट दाखवलं आणि तुम्ही पुरुषांना खूश करण्यासाठी असतात. महिलांनी पुरुषांना खूश करायला पाहिजे म्हणत महिलेच्या जातीचा उल्लेख केला. तसंच महिलेला अश्लील शिवीगाळही केली. त्यानंतर महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक भदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


पितापुत्राच्या जोडीने कृत्य केल्याने खळबळ
महिलेचा छळ आणि अश्लील कृत्य पितापुत्राच्या जोडीने केला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघेही परिसरातील चांगलेच नामांकित व्यावसायिक आहेत. त्यांनी अनेकदा महिलेला एकट्यात त्रास दिला होता. मात्र वडिलांनंतर पुत्रही त्रास द्यायला लागल्याने सगळीकडे दोघांवर संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनीही या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.