नवी दिल्ली : इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अब्दुल सुभान कुरेशीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट करण्याचा कट त्याने रचला होता.


व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला कुरेशी बॉम्ब बनवण्यात तरबेज आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद, जयपूर यांसारख्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचं म्हटलं जातं.

पी चिदंबरम जेव्हा गृहमंत्री होते, तेव्हा 50 वॉण्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती आणि यात आयएमचा दहशतवादी कुरेशीच्या नावाचाही समावेश होता. बॉम्बस्फोटाआधी कुरेशी आपली टीम उभी करत असे. तसंच तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना अशा कटांसाठी तो तयार करत असे.

तौफिक दिल्लीत मोठ्या उद्देशाने आला होता. त्याच्या अटकेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी त्याचा नेमका उद्देश काय होता याची चौकशी सुरु आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवली आहे.