PM Modi's Advisor: 1985 बॅचचे आयएएस अधिकारी अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कराराच्या आधारावर केली जाते. ते 30 सप्टेंबर रोजी सचिव (उच्च शिक्षण) म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात देशाचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले होते.


अमित खरे यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य आणि विविध क्षेत्रातील विस्तृत अनुभवाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी उज्ज्वला योजनेतही योगदान दिले. त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर थोड्याच दिवसात, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला 29 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.







चारा घोटाळा केला होता उघड 
अमित खरे यांनी प्रसिद्ध चारा घाटोळा उघड केला होता, ज्यात राजद अध्यक्ष लालू यादव यांना तुरुंगात जावे लागले होते. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी चारा घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले.


केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा चारदिवसांपूर्वी राजीनामा


केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. गेल्या तीन वर्षांपासून ते सल्लागार होते. यापुढील काळात संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ब्रमण्यम यांनी ट्विट करून सांगितले की, मी माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रात जाऊन संशोधन करण्याचा मानस आहे. देशाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. मला प्रचंड प्रोत्साहन आणि समर्थन मिळाले. माझ्या व्यावसायिक जीवनाच्या तीन दशकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रेरणादायी नेता मिळाला नाही. त्यांना आर्थिक विषयातील खोल माहिती आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा दृढ संकल्प आहे.’