नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सीरिजमध्ये अश्विनचा समावेश न केल्याने भारताची माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ नाराजी व्यक्त केली. आयपीएलच्या 13व्या मोसमात मोठ्या खेळाडूंना तंबूत पाठवणाऱ्या अश्विन अजुनही टी -20 फॉर्मेटमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो. दिल्ली कॅपीटल्सच्या सहाय्यक कोच मोहम्मद कॅफ म्हणाला, की ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. अश्विनला ऑस्ट्रेलियला दौऱ्यात फक्त टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. मोहम्मद कैफने ट्वीटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




कैफने एका ट्विटमध्ये लिहिले आहे, "विराट, रोहित, पोलार्ड, गेल, वॉर्नर, क्विंटन डी कॉक, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, पडिकल, पूरन हे ते खेळाडू आहेत ज्यांच्या विकेट अश्विनने आयपीएल -13 मध्ये घेतल्या आहेत. अश्विनने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. मला वाटते अश्विन टी -20 मध्ये भारतासाठी मोलाचा ठरू शकेल. "अश्विन आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळला आणि संघासाठी लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो वेगवान गोलंदाज मार्कस स्टोईनिससह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर होता.


भारतीय संघाचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौरा; वेळापत्रक जाहीर


आयपीएलच्या 13 व्या सत्रात त्याने 15 सामन्यांत 13 गडी बाद केले. अश्विनने 2017 मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध अखेरचा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात त्याला विकेट घेता आल्या नाहीत. मात्र, 11 धावा काढून तो नाबाद परतला. वनडेमध्ये खेळण्याची ही शेवटची वेळ होती. मात्र, अश्विन सतत कसोटी सामने खेळत आहे.